
गणपतीपुळे रोडवर झालेल्या अपघातात रिक्षाचालक जखमी
रत्नागिरी शहरानजीकच्या गणपतीपुळे रस्त्यावर झालेल्या चारचाकी गाडी व रिक्षा अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, वैभव प्रभाकर निखारगे (४२ रा. एकतानगर खेडशी) हा रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. गणपतीपुळे रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर आरेवारे मार्गे जाणाऱ्या इर्टिगा चारचाकी गांडीने ७ सप्टेंबर रोजी रिक्षेलाजोरदार ठोकर दिली. ही ठोकर इतकी भीषण होती की चारचाकी गाडी रस्त्याच्या बाजूला उतरली तर रिक्षा बाजूला गेली. दरम्यान जखमी रिक्षाचालकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
www.konkantoday.com