
जर प्रवेश मिळाला असता तर कदाचित आत्महत्या टळली असती
राजापूर शहरातील अर्जुना नदीत आत्महत्या केलेल्या गुरववाडी येथील प्रांजली कृष्णा गुरव या १९ वर्षीय तरुणीवर गुरूवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान प्रांजली बारावीनंतर नर्सिंगच्या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र प्रवेश मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याची. प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
शहरातील गुरववाडी येथील प्रांजली कृष्णा गुरव (१९) या तरूणीने वरचीपेठ येथे अर्जुना नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सांयकाळी घडली. अर्जुना नदीच्या पाण्यात उडी घेतल्यानंतर वाहेत असताना काही पादचाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने वरचीपेठ व खडपेवाडी येथील तरूणांनी तिला पाण्याबाहेर काढत रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. नदीत उडी मारण्यापूर्वी प्रांजलीने विषारी औषध प्राशन केल्याचीही माहिती समोर आली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती
www.konkantoday.com