
रत्नागिरीत रिजनल कनेक्टीव्हिटी स्कीमअंतर्गत नागरी प्रवासी विमानसेवा सुरू करण्याची खासदार विनायक राऊत यांची मागणी
तटरक्षक दलाच्या अखत्यारीत असलेल्या रत्नागिरीतील विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे. विमानतळाचा 2 के.एल. रनवे तयार करण्यात आला असून रिजनल कनेक्टीव्हिटी स्कीमअंतर्गत नागरी प्रवासी विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री हरिदिपसिंग पुरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री हरिदिपसिंग पुरी यांना दिलेल्या निवेदनात रत्नागिरी विमानतळाच्या कामाबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. विमानतळाचा रनवेही तयार झाला असल्याने आता विमान वाहतूकीची प्रतिक्षा आहे.
www.konkantoday.com