गणेशोत्सवापूर्वी रेल्वेस्टेशन ते बसस्थानक बसफेऱ्या वाढवाव्यात, शिवसेनेची मागणी
खेड,- गणेशोत्सवापूर्वी रेल्वेस्टेशन ते बसस्थानक बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी शिवसेनेतर्फे नुकतेच राज्य परिवहन महामंडळाच्या खेड आगारात निवेदन देऊन करण्यात आली आहे. या वेळी शहरप्रमुख कुंदन सातपुते यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
खेड येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आगार व्यवस्थापक यांची नुकतीच शिवसैनिकांच्या शिस्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. गौरी-गणपती सणानिमित्त रेल्वेस्टेशन ते खेड स्थानक जादा बस उपलब्ध कराव्यात, अशी मागणी या निवेदनात प्रामुख्याने करण्यात आली आहे. या वेळी शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, मिनार चिखले, सतीश चिकणे, स्वप्नील सैतवडेकर, प्रेमल चिखले व शिवसैनिक उपस्थित होते.
संध्याकाळच्या वेळेत शाळा सुटल्यानंतर सुटणाऱ्या ग्रामीण भागातील गाड्या सध्या अनियमित वेळेत सोडल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
www.konkantoday.com