
काहीच कार्यवाही न झाल्याने मंडणगडातील मुख्य नद्या रूतल्या गाळात
चला नदीला जाणून घेवू या अंतर्गत २०१७ साली मंडणगड पंचायत समिती माध्यमातून तालुक्यातील भारजा नदी गाळ मुक्त करण्यासाठी प्रशासनाने लोकचळवळीचा महत्वाचा उपक्रम हाती घेतला. यानंतर तालुक्यात नद्यांच्या प्रदूषणासंदर्भात जनजागृती सुरू झाली तरी कृती मात्र काहीच झाली नाही. यामुळे आज मंडणगडातील मुख्य नद्या गाळात रूतल्या आहेत. पावसाळ्यात यामुळे अनेक समस्यांना तोंड फुटणार असून प्रशासकीय उदासीनतेचा फटका नागरिकांना बसणार आहे.www.konkantoday.com