
अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी पॉक्सो न्यायालयाकडून वृद्धाला एक वर्षाचा कारावास
रत्नागिरी येथील धार्मिक स्थळी आठ वर्षीय मुलीशी गैर कृत्य करणाऱ्या वृद्धाला न्यायालयाने एक वर्ष कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली अलिमिया महंमद सोलकर (वय ७४ वर्षे) याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी पॉक्सो न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली.२८ फेब्रुवारी २०२१ या दिवशी सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातील धार्मिक स्थळात घडली होती. या दिवशी अल्पवयीन मुलगी (पीडिता) नेहमीप्रमाणे धार्मिक स्थळातून कुराण शिकून बाहेर पडत असतांना अलिमियाने पीडितेचा हात धरून तिचा लैंगिक छळ केला. रत्नागिरी पोलीस ठाण्याच्या वतीने भा.दं.वि. कलम ३५४ (अ) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे आरोपीवर दोषारोप ठेवण्यात आले. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्त्या (सौ.) मेघना सुहास नलावडे यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले. पुरावा आणि सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी शिक्षा सुनावली.
www.konkantoday.com