
राष्ट्रवादीचे माजी युवक तालुकाध्यक्ष राजेश भाटकर यांचा भैय्या सामंत यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश
रत्नागिरी राष्ट्रवादीचे माजी युवक तालुका अध्यक्ष राजेश भाटकर यांनी किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे नेते सुदेश मयेकर यांच्या प्रयत्नानंतर राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आता शिवसेनेकडे कल दिसत असून पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज राजेश भाटकर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी किरण सामंत,सुदेश मयेकर, मिलिंद खानविलकर, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.www.konkantoday.com