भाजपा प्रदेश सरचिटणीस अँड. माधवी नाईक रत्नागिरी दौऱ्यावर_________)रत्नागिरी : भाजपच्या प्रदेश सरचिटणीस .अँड माधवी नाईक येत्या शनिवारी (ता. २) रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत.
अॅड. नाईक २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता रत्नागिरीत येणार आहेत. त्यानंतर त्या कुवारबाव येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित संपर्क ते समर्थन या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर लक्ष्मीकेशव नगर येथे माजी आमदार बाळासाहेब माने व सौ. माधवीताई माने यांच्या श्रीविजय या निवासस्थानी अॅड. नाईक सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर साधारण १२.३० वाजता जिल्हा भाजपा कार्यालयास भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी वार्तालाप करतील. दुपारी १.०० वाजता रत्नागिरी शहराची टिफिन बैठक पऱ्याची आळी येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात होणार आहे. या वेळी शहरातील बूथ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
या बैठकीनंतर दुपारी २.३० वाजता माळनाका डॉ. केळकर मार्गावरील जयेश मंगल कार्यालयात महिला आघाडीतर्फे आयोजित मंगळागौर कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. माधवीताई नाईक यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर अॅड. नाईक केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा आढावा घेणार आहेत.
www.konkantoday.com