उदय सामंत फाउंडेशन व शिवसेना तालुका महिला आघाडीच्या माध्यमातून ४ सप्टेंबर पासून भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन


महाराष्ट्राचे उद्योगमंत्री-रत्नागिरी -रायगडचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या सहकार्याने तसेच  उदय सामंत फाउंडेशन व शिवसेना तालुका महिला आघाडीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील एकूण १० जिल्हा परिषद गटात मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेची सुरवात ४ सप्टेंबर पासून होणार असून स्पर्धेची सांगता १५ सप्टेंबर  रोजी होणार आहे. तालुक्यातील 234 संघांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. तालुक्यातील पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांच्या मतदार संघात होणा-या भव्य मंगळागौर स्पर्धेसाठी अनेक महिलांच्या गटांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. जिल्हा परिषद गटांमध्ये होणा-या स्पर्धेचे नियोजन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे.

नाचणे जिल्हा परिषद गटामध्ये २२ संघ सहभागी झाले असुन ४ सप्टेंबर ला स्वामी समर्थ हॉल,नाचणे येथे होणार आहे.कोतवडे गटामध्ये २३ संघ असुन ५ सप्टेंबरला महालक्ष्मी हॉल,गणपतीपुळे येथे होणार आहे.वाटद गटात २७ संघांची नोंद झाली असुन ६ सप्टेंबर सर्वसाक्षी हॉल,वाटद येथे होईल. करबुडे गटात २२ संघ असुन ८ सप्टेंबरला दत्तकृपा मांगल्य मंगल कार्यालय,जाकादेवी येथे होणार आहे.शिरगांव जिल्हा परिषद गटात ९ सप्टेंबर ला ओंकार मंगल कार्यालय,शिरगांव,तर गोळप गटात १० सप्टेंबरला फणसोप हायस्कूल,फणसोप सडा येथे होणार असुन २३ संघांनी सहभाग घेतला आहे.मिरजोळेमध्ये २० संघ येणार असुन १२ सप्टेंबरला ग्रामपंचायत हॉल,मिरजोळे येथे होणार आहे.
जिल्हा परिषद पावस गटात २२ संघ सहभागी झाले असुन १३ सप्टेंबरला मातोश्री मंगल कार्यालय,पावस-पूर्णगड रोड,मेर्वी येथे होईल. हरचिरी गटात २२ संघ सहभागी झाले असुन १४ सप्टेंबरला स्वामी समर्थ हॉल,नाचणे, हातखंबा मध्ये ३२ संघ सहभागी होते हा कार्यक्रम १५ रोजी श्रीमंगल कार्यालय,पाली येथे होणार आहे.
. ना.उदय सामंत आयोजित करत असलेल्या मंगळागौर स्पर्धेच्या या आयोजनामुळे रत्नागिरी शहर व ग्रामीण भागातील महिलांच्या सुप्त गुणांना तसेच कलागुणांना वाव मिळत आहे. ना.उदय सामंत साहेब यांच्याकडून नेहमीच क्रिडा क्षेत्रात कार्यरत असणा-या तसेच कला क्षेत्रात कार्यरत असणा-या मतदार संघातील तसेच महाराष्ट्र भरातील प्रत्येक खेळाडू आणि कलाकाराला उत्तेजन मिळत असते. उदय सामंत फाउंडेशन आणि शिवसेना महिला शहर आघाडी यांच्या वतीने नुकत्याच रत्नागिरी शहरामध्ये पार पडलेल्या मंगळागौर स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला होता. सदर मंगळागौर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवसेना रत्नागिरी तालुका महिला आघाडीच्या प्रमुख श्रीम.कांचन नागवेकर आणि शिवसेना तालुका महिला आघाडीच्या उपतालुका प्रमुख ज्योती मयेकर ,स्मिता भिवंदे,दाक्षायणी शिवगण तसेच विभाग प्रमुख अपर्णा बोरकर,स्वरा देसाई, मेघना पाष्टे, संस्कृती पाचकुडे, साक्षी कुमठेकर, ऐश्वर्या विचारे, शुभांगी पड्ये,प्रज्ञा शिगवण,विद्या बोंबले, रिया साळवी या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button