
आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत चिपळुणात मेळावा
आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत चिपळुणात दि. ३ सप्टेंबर रोजी कोकण प्रदेश कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून गाव भेटीचा कार्यक्रम जोरदारपणे सुरू आहे.गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते व सरचिटणीस उमेश सकपाळ यांनी दिली. चिपळूण तालुक्यात आरपीआय पक्षाची मोठी ताकद आहे. अलिकडच्या काळात मात्र कोणते मोठे कार्यक्रम राबविण्यात न आल्याने पक्षांतर्गत थोडी मरगळ आली होती. ती मरगळ झटकून पुन्हा एकदा नव्याने उभारी घेण्यासाठी, संघटन बांधणीत तरूणांना सहभागी करून घेण्यासाठी आणि पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी या कोकण प्रदेश कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com