
मोफत उपचारामुळे रुग्णांचा ओढा शासकीय रुग्णालयांकडे मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कमतरतेचे काय?
मोफत उपचारामुळे रुग्णांचा ओढा शासकीय रुग्णालयांकडे वाढला असला तरी रत्नागिरी जिल्ह्यात अनेक रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे
राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून शासकीय रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार देण्याची घोषणा केली आहे. मात्र ही सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तेवढे पुरेसे बळ उपलब्ध आहेत का हे पाहणे गरजेचे आहे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय व तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील मंजूर ९१ पैकी फक्त २५ डॉक्टरांची पदे भरलेली आहेत तर कंत्राटी आणि बंधपत्रीत स्वरुपात जिल्ह्यात सध्या ४४ डॉक्टर काम पाहत आहेत. मोफत उपचारांसाठी नागरिकांचा जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे ओढा. वाढला असला तरी या सर्वच रुग्णांना सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा मात्र अपुरी पडत आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी नुकतीच राज्य शासनाने मोफत उपचारांची मोहीम १५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु केली आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आता मोफत उपचार सुरु करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वसामान्यांकडून स्वागत होत आहे. मात्र
जिल्हा रुग्णालयात असलेली डॉक्टरांची रिक्त पदे व त्यामुळे होणारी सर्वसामान्यांची धावपळ हा गंभीर विषय ठरत आहे.
www.konkantoday.com