एका मावशीच्या घरून बेपत्ता झालेला अल्पवयीन मुलगा दुसऱ्या मावशीच्या घरी सापडला

0
83

एका मावशीच्या घरून बेपत्ता झालेला अल्पवयीन मुलगा दुसऱ्या मावशीच्या घरी सापडण्याची घटना घडली आहे
रत्नागिरी शहरालगतच्या टिआरपी येथून बेपत्ता झालेला १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा छोट्या मावशीच्या घरी आढळून आला. राज सुनील वाघाटे (१६, रा. टिआरपी रत्नागिरी) असे या मुलाचे नाव आहे. ४ सप्टेंबर २०२२ रोजी त्याच्या एका मावशीने राज हा बेपत्ता झाल्याची. तक्रार शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार वर्षभरापासून पोलीस राज याचा शोध घेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिआरपी येथून ४ सप्टेंबर २०२२ रोजी राज हा राहत्या घरातून अचानक बेपत्ता झाला होता. याप्रकरणी राज याला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार त्याच्या मावशीने शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या तपासामध्ये राज हा त्याच्या घाटकोपर मुंबई येथील धाकट्या मावशीच्या घरी असल्याचे आढळून आले. . पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून तक्रार दाखल करणाऱ्या मावशीच्या ताब्यात दिले असून या मुलाचा तपास थांबविण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here