
जिल्हा काँग्रेसच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह
काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवार ५ ऑक्टोबररोजी सकाळी ११.३० वाजता उत्तर प्रदेशचे मुंख्यामत्री अजय मोहन बिष्ट उर्फ योगी आदित्यनाथ यांच्या’ गुंडाराज’ व हाथरस येथील अत्याचार झालेल्या युवतीला न्याय मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात येणार असून रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी,महिला काँग्रेस,राष्ट्रीय सेवा दल,युवक काँग्रेस, एन् एस यु आय, अल्पसंख्याक सेल व इतर सर्व सेलच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले यांनी केले आहे
www.konkantoday.com