महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट आठ मंडप डेकोरेटर मध्ये रत्नागिरीचे ओम साई डेकोरेटर्स चे अमरेश सावंत यांचा दिल्लीत सन्मान

0
107

दिल्लीत मंडप व्यावसायिकांच्या आकार २०२३ सोहळ्यात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट आठ मंडप डेकोरेटर ची निवड करण्यात आली त्यामध्ये रत्नागिरीचे ओम साई डेकोरेटर्स चे मालक अमरेश सावंत यांचा दिल्लीत सन्मान करण्यात आला.
रत्नागिरीच्या ओम साई डेकोरेटर्सचे अमरेश सावंत यांचा दिल्लीत मंडप व्यावसायिकांच्या ‘आकार २०२३’ सोहळ्यात आकार एक्सलन्स अॅवॉर्ड देऊन मंडप डेकोरेटर म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे.
ओम साई डेकोरेटर्स हे अमरेश सावंत यांचे आहे. ओम साई डेकोरेटर्सनी अनेक कुटुंबातील मंगल क्षण आपल्या नावीन्यपूर्ण सजावटीने अविस्मरणीय बनवले आहेत. व्यवसायाची कोणतीच पार्श्वभूमी नाही, अशा मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सावंत यांनी गेल्या काही वर्षात अविरत मेहनत घेऊन आपला व्यवसाय उंचीवर नेऊन ठेवला आहे. सातत्याने नवे प्रयोग करत हा मंडप आणि डेकोरेशन व्यवसायातील ब्रँड तयार केला. कोणताही कौटुंबिक सोहळा असो, राजकीय सभा असो, की कार्यक्रम कोकणात आज विश्वासाने त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या याच कार्याची दखल दिल्लीतील मंडप व्यावसायिकांनी घेतली आहे. राष्ट्रीय पातळीवर मंडप-डेकोरेशन-इव्हेंट यामध्ये काम करणाऱ्या देशातील व्यावसायिकांचा दिल्लीत सन्मान करण्यात आला. त्यात अमरेश सावंत यांना आकार एक्सलन्स अॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार अमरेश सावंत यांनी स्वीकारला. या यशात त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू नीलेश सावंत आणि संपूर्ण सावंत कुटुंबाचा मोलाचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली. दिल्लीत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अमरेश सावंत आणि ओम साई डेकोरेटर्स यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here