पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी यंत्रणे करून टाळाटाळ -शौकत मुकादम यांचा आरोप


पंतप्रधानानी गरीब शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजना देशातील कमी उत्पन्नाच्या शेतकऱ्यांना लागू केली आहे. ही योजना सर्व सामान्य शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय चांगली आहे. या योजनेमधे जे ग्रामीण भागातील लाभार्थी आहेत त्यांना तालुका पातळीवर हेलपाटे मारावे लागत आहेत. सुरुवातीला या योजनेचा लाभ बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मिळत होता, पण गेल्या वर्षभरात ज्या राष्ट्रीयीकृत बँकेत शेतकऱ्यांची खाती उघडलेली आहेत त्या खात्यात आता पैसेच जमा होताना दिसत नाहीत. संबंधित लाभार्थीनी चौकशी केली असता त्यांचा लाभ दुसऱ्याच कोणत्यातरी बँकेत जमा होताना दिसतो, पण लाभार्थी चौकशीला गेले असता ‘संबंधित अधिकारी योग्य मार्गदर्शन करतनाहीत व लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात, असे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी सांगितले.
तालुका कृषि अधिकारी म्हणतात की, लाभार्थीच्या खाते क्रमांकाचा कोड नंबर आमच्याकडे उपलब्ध होत नाही. तुम्ही तहसिलदार कार्यालयाकडे संपर्क साधा. वरील योजनेचे प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये शासनाने जमा करावयाचे आहेत. काही खात्यात वर्षभरात एकही झालेला नाही, त्यामुळे ग्रामीण गरीब शेतकयांना वरील लाभ मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची आलेली आहे, असा आरोप मुकादम यांनी केला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button