
आमदारकीची जोरदार तयारी सुरू, माजी आमदार सदानंद चव्हाण
विधानसभा निवडणुकीची चिपळूणची जागा शिवसेनेला मिळणारच नाही असे कोणीही सांगितलेले नाही. त्यामुळे येथे भगवा कायम फडकत राहिला पाहिजे. ही शिवसेनाप्रमुखांची असलेली इच्छा यामुळे आमदारकीची जोरदार तयारी मी सुरू केली असून कार्यकर्ते कामाला लागले असल्याची माहिती माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीत उमेदवारीवरून तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.ते पुढे म्हणाले की, महायुतीचे सरकार आहे. महायुती म्हणून पुढील निवडणुका लढवल्या जाणार आहेत. असे असले तरी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळणार नाही असे कोणी म्हणूही नये व असा विचार आम्हीही करीत नाही. शेखर निकम आमदार आहेत. त्यांचा पक्षही महायुती आहे. म्हणून त्यांनाच उमेदवारी मिळेल. आपल्याला काहीच मिळणार नाही असा विचर करून आपण मागे राहणार नसून माझ्यासाठी निकम यांनी मागे रहावे असेही मी बोलणार नाही. www.konkantoday.com