
तुतारी-कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये आरक्षण केलेल्यांनाच बसण्यासाठी करावी लागते आहे कसरत.
कोकण मार्गावर नियमितपणे धावणार्या तुतारी एक्सप्रेससह कोकणकन्या एक्सप्रेसचे स्लीपर डबे जनरल बनले आहेत. प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांसह जनरल तिकिट असलेल्या प्रवाशांसह जनरल तिकिट असलेल्या प्रवाशांची स्लीपर डब्यांमध्ये घुसखोरी वाढली आहे. यामुळे आरक्षित तिकिट असणार्या प्रवाशांना गाड्यांमध्ये एन्ट्री मिळवताना दमछाकच होत आहे. वेटींगवरील प्रवाशांना डब्यांमध्ये चढण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र या प्रवाशांवर दंडात्मक अथवा खाली उतरवण्याची कारवाई कागदावरच राहिल्याने सार्यांचेच फावत आहे.नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या दिशेने जाणार्या सर्वच रेल्वेगाड्या गर्दीने धावत आहेत.
हिवाळी स्पेशल गाड्याही विक्रमी गर्दीनेच धावत आहेत. त्या त्या स्थानकात दाखल होणार्या रेल्वेगाड्यांमध्ये एन्ट्री मिळवताना प्रवाशांची चढाओढच सुरू आहे. परप्रातीय प्रवासी थेट आरक्षित डब्यांमध्ये घुसत असून जनरल डब्यांमध्येही आरक्षित तिकिटांच्या नावाखाली अरेरावी सुरू आहे.www.konkantoday.com