
रस्त्याच्या कामाला वर्षपूर्ती होण्यापूर्वीच पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे
रस्त्याच्या कामाला वर्षपूर्ती होण्यापूर्वीच पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडले आहेत
राजापूर शहरात सुमारे १ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या शहरातील तालिमखाना ते जवाहर चौक या रस्त्याला पहिल्याच पावसात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दुतर्फा धावणाऱ्या वाहनांना खड्डे चुकवत वाहने चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. हे रस्ते गणेशोत्सवापूर्वी बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून केली जात आहे.
गेली काही वर्षे शहरातील तालिमखाना ते जवाहरचौक या मुख्य रस्त्यामध्ये पडलेले खड्डे शहरवासीयांची डोकदुखी ठरली होती. केवळ खड्डे तात्पुरते बुजवण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली जात नव्हती. शासनाकडून उपलब्ध झालेल्या झालेल्या सुमारे एक कोटीच्या निधीतून या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र कामाला वर्षपूर्ती होण्यापूर्वीच पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
www.konkantoday.com