
अखेर अंगणवाडी सेविकांचा संप मागे; पेन्शन योजना, ग्रॅच्युईटी लागू करण्यावर शिक्कामोर्तब
अंगणवाडी सेविका व मदतनीसांना पेन्शन योजना व ग्रॅच्युइटी लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी केली जाईल, या निर्णयाची घोषणा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केल्यानंतर अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी संप मागे घेतला.मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मिनी अंगणवाड्याचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर, सेविकांना तत्काळ मोबाईल दिले जाणार असून, मानधनवाढीचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला.
www.konkantoday.com