खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागामध्ये भर पावसाळ्यात वाळू चोरटे जोरात, प्रशासनाचे दुर्लक्ष
संगलट ( खेड )(प्रतिनिधी )
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागामध्ये भर पावसाळ्यात वाळू चोरट्याने वाळू चोरण्याचा चांगला सपाटा मांडला आहे याबाबत मात्र प्रशासन कोणतीच भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
शासनाकडून अद्याप वाळू साठी कोणतीच प्रतिक्रिया नसताना खेड खाडीपट्टा विभागातील कोतवली वाशिष्टी नदी आणि जगबुडी नदी दरम्यान गेल्या एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू उत्खन होत आहे सदरची ही वाळू खेड खाडीपट्ट्यातील करजी परिसरामध्ये उत्तरवली जात आहे तसेच वाळूंनी भरलेल्या बोटी ह्या समुद्र मार्गाने दापोली तालुक्यातील उन्नवरे फरारे परिसरामध्ये आणून त्या ठिकाणी देखील खाली केल्या जात आहे त्यामुळे शासनाची लाखो रुपयाची रॉयल्टी बुडवली जात आहे त्याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे?
पावसाळ्यात चोरटी वाळू उत्खन करणाऱ्यांनी चांगल्याच आपला मोर्चा शासनाची चोरी करण्याकडे लावला आहे सदरच्या वाळूंनी भरलेल्या गाड्या दिवसाभर रस्त्याने धावताना सर्वसामान्यांना दिसत आहे मात्र प्रशासनाला का दिसत नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी पावसाळ्यामध्ये शासनाची लय लूट करणाऱ्या वर संबंधित प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमीतून जोरदार होत आहे
www.konkantoday.com