राजापुरात मुसळधार सुरूच, पुर स्थिती गंभीर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा


राजापूर शहरात मंगळवार दुपारपासुन जोरदारपणे बरसणारा पाउस अद्यापही थांबायचे नाव घेत नसुन सर्वत्र पुरस्थिती निर्माण झाली आहे . अर्जुना नदीने धोक्याची पातळी गाठल्याने राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी भरु लागल्याने नगर परिषद प्रशासनाने भोंगा वाजवुन नागरिकाना सतर्कतेचा इशारा दिला आहे .
यावर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पुराचे पाणी जवाहर चौकाच्या पुढे आले असल्याने व्यापारी व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असुन अद्यापही पाउस मुसळधारपणे कोसळत असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे . अर्जुना नदीने काल इशारा पातळी ओलांडल्याने शहरातुन वाहणार्या अर्जुना व कोदवली या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहु लागल्या होत्या . बुधवारी पावसाचा जोर वाढल्याने पुराचे पाणी जवाहर चौकातील ध्वजस्तंभापर्यंत आले होते . मात्र पावसाचा जोर अद्यापही कमी न झाल्याने गुरुवारी पुराची तिव्रता वाढली असुन पुराचे पाणी बाजारपेठेच्या मुखाशी आले आहे . अजुनही पुराचे पाणी वाढण्याची शक्यता आहे .
Www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button