
रत्नागिरी शहरातील वेश्या व्यवसाय प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी शहरातील सिद्धिविनायकनगर येथील वेश्या व्यवसाय प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या प्रकरणातील चौथा आरोपी समिर मंगेश लिंबुकर (वय २३, रा.देवरुख, सध्या आरोग्य मंदिर) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे या आधी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केल्याने आता आरोपींची संख्या चार झाली आहे या प्रकरणात पोलिस आता सखोल जाऊन तपास करीत असून त्यामुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे सदरचे आरोपी गेले अनेक महिने हा व्यवसाय करीत असून यासाठी त्यांनी विविध ठिकाणांचा वापर केला असल्याचेही पोलीस तपासात उघड होत आहे या प्रकारात रत्नागिरी शहरातील काही लोकांच्या सहभागाबरोबर आजूबाजूच्या काहींचा समावेश असल्याचे कळत आहे यासाठी माहिती गुप्त रहावी म्हणून आरोपीनी काही कोड भाषा वापरत असल्याचेही कळत आहे
परंतु या संबंधीच्या अन्य नावांबाबत पोलीस आरोपींकडे कसून चौकशी करत असून त्यातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे या प्रकरणात ज्या मुली सापडल्या आहेत त्यांच्याबाबतही पोलीस सखोल तपास करीत असून यामागे कोण नेमके सूत्रधार आहेत याचा तपास सुरू आहे
www.konkantoday.com