आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही, ‘या’ कागदपत्रावरून ठरणार तुमचं नागरिकत्व!

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या पडताळणी मोहिमेदरम्यान, असे आढळून आले की मोठ्या संख्येने बेकायदेशीर परदेशी नागरिक, विशेषतः बांगलादेशी आणि रोहिंग्या, आधार, पॅन आणि रेशन कार्डच्या मदतीने स्वतःला भारतीय नागरिक असल्याचा दावा करत होते.

*हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांकडे आधार, रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि UNHCR (संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठी उच्चायुक्त) द्वारे जारी केलेले कार्ड देखील आढळले आहेत. यामुळे भारतीय नागरिकत्व अचूकपणे ओळखणे कठीण झाले. म्हणून, आता मतदार ओळखपत्र किंवा भारतीय पासपोर्ट अनिवार्य करण्यात आले आहे.“दिल्ली पोलिसांनी सर्व जिल्ह्यांच्या डीसीपींना त्यांच्या भागातील संशयास्पद व्यक्तींवर पाळत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धची मोहीम शेवटच्या व्यक्तीलाही त्याच्या देशात परत पाठवले जात नाही तोपर्यंत सुरू राहील. गरज पडल्यास, आम्ही बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्यासाठी गुप्तचर संस्थांशी संपर्क साधू,” असे त्यांनी पुढे सांगितले.

*यासोबतच दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानातून येणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई देखील तीव्र केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत राहणाऱ्या सुमारे ३,५०० पाकिस्तानी नागरिकांपैकी सुमारे ५२० मुस्लिम आहेत, त्यापैकी ४०० हून अधिक लोक आतापर्यंत अटारी सीमेवरून पाकिस्तानात परतले आहेत.पहलगाममध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, केवळ वैद्यकीय, राजनैतिक आणि दीर्घकालीन व्हिसा (LTV) असलेल्या नागरिकांनाच सूट देण्यात आली आहे. २९ एप्रिलनंतर वैद्यकीय व्हिसा देखील अवैध मानला जाईल. दिल्ली पोलिस आणि गुप्तचर संस्थांना दिल्लीत राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची माहिती गोळा करण्याचे आणि त्यांना तात्काळ देश सोडण्यास सांगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारने असेही स्पष्ट केले आहे की, ज्या हिंदू पाकिस्तानी नागरिकांवर आधीच दीर्घकालीन व्हिसा आहे त्यांचे व्हिसा अबाधित राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button