रत्नागिरीत पुन्हा  हेल्मेट सक्ती? दुचाकीस्वारासह मागे बसलेल्याही हेल्मेट बंधनकारक अन्यथा एक हजार रुपये दंड

रत्नागिरी दि. ०२ : रत्नागिरी जिल्हयात होणाऱ्या अपघातात मोटार सायकल चे अपघात व त्यात मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. रत्नागिरी जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, महामंडळे, महानगरपालीका व सर्व शासकीय आस्थापना तसेच खाजगी आस्थापना यांनी यांच्या आस्थपनेत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना तसेच कार्यालयात येणाऱ्या सर्व दुचाकी चालक व मागे बसुन येणाऱ्या व्यक्तीस संरक्षक शिरस्त्राण (हेल्मेट) परिधान करणे बंधनकारक असुन त्याची त्वरीत प्रभावाने अंमलबजावणी सुरु करण्यात येत आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम, महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ कलम २५० नुसार राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग या व्यतिरीक्त इतर रस्त्यांवर ५० सी.सी पेक्षा कमी इंजिन असलेले मोपेड व पगडी परिधान केलेले शिख समुदायातील व्यक्तीस मोटार वाहन कायदा १९८८ कलम १२९ च्या तरतुदीनुसार अपवाद करण्यात आलेला आहे.
संरक्षक शिरस्त्राण (हेल्मेट) परिधान न केलेल्या दुचाकी चालक व मागे बसलेल्या व्यक्ती विरुध्द मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९/१७७,२५०(१) नुसार तसेच कलम १९४(३) अन्वये संबंधीत आस्थापना प्रमुख यांचे विरुध्द गुन्हा नोंद करुन त्यांचे कडून रु. १ हजार दंड तसेच वाहनधारकाची अनुज्ञप्ती ३ महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button