
जिल्हा रूग्णालयाची नवीन इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत, रूग्णांना मात्र जमिनीवर झोपण्याची वेळ
रत्नागिरी ः जिल्हा रूग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयाजवळ रुग्णालयाची नवीन इमारत बांधून पूर्ण झाली असून या इमारतीचे काम एक वर्ष पूर्ण होवूनही ही इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे रूग्णालयात मोठ्या संख्येने दाखल होणार्या रूग्णांना आता जमिनीवर गाद्या टाकून झोपवण्यात येत आहे. सध्या पडणार्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात अनेक साथी उद्भवल्या असून त्यामध्ये सर्दी, ताप व जुलाबाच्या साथीनी जोर केल्यामुळे रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वसामान्य रूग्णांना व ग्र्रामीण भागातील रूग्णांना जिल्हा रूग्णालय हेच आधार असल्याने या ठिकाणी उपचार घेण्यासाठी यावे लागते. गेल्या दोन तीन दिवसात रुग्णांची संख्या क्षमतेपेक्षा वाढल्याने जिल्हा रूग्णालयात आलेल्या रूग्णांना उपचारासाठी कोटा शिल्लक नसल्याने रूग्णांची गैरसोय होवू नये म्हणून जमिनीवर गाद्या टाकून त्यांचेवर उपचार करण्यात येत आहेत. यामुळे उद्घाटनासाठी खोळंबलेल्या इमारतीचे उद्घाटन लवकर करून ही इमारत रूग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी व या कामी आमदार उदयजी सामंत यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com