संगमेश्वर तालुक्यातील चिखली मोहल्ला येथे समीर हुसेन हुजूरे यांच्या घराच्या मागील बाजूस लाकडाच्या खोपीखाली एक बिबट्याचा बछडा दिसून आला.याबाबतची माहिती वन विभागाला मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या बछड्यास ताब्यात घेतले. या बछड्यास उपचाराकरिता पुणे येथील केंद्रात पाठवण्यात आले आहे.
तालुक्यातील समीर हुसैन हुजुरे (चिखली मोहल्ला) यांचे राहते घरा मागील बाजूस लाकडाच्या खोपीखाली बिबट्याचे पिल्लू बसले असल्याची माहिती पोलिस पाटील रुपेश विठ्ठल कदम यांनी वनविभागास दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यात बछड्यास कोणतीही जखम नसल्याची माहिती वनविभागाने दिली. बछडा मादी जातीचे असून त्याचे वय अंदाजे २ ते ३ महिने आहे
www.konkantoday.com
Home स्थानिक बातम्या संगमेश्वर तालुक्यातील चिखली मोहल्ला येथे समीर हुसेन हुजूरे यांच्या घराच्या मागील बाजूस...