चिपळूण-कोंडमळा येथे स्कॉर्पिओ व शेवरलेट स्पार्क गाडी यांची समोरासमोर टक्कर, अपघातात एकाचा मृत्यू
चिपळूण-कोंडमळा येथे रायगडच्या दिशेने जाणार्या स्कॉर्पिओ व शेवरलेट स्पार्क गाडीची समोरासमोर टक्कर होवून झालेल्या अपघातात स्पार्क गाडीतील प्रवासी चंद्रकांत अनंत गंगावणे यांचा मृत्यू झाला. यातील फिर्यादी श्रीराम पवार हे आपल्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडी (क्र. एम.एच. ०६ एक्स-६४६५) मधून कळंबस्ते, ता. संगमेश्वर ते पोलादपूर जि. रायगड असा प्रवास करीत असताना त्यांची गाडी कोंडमळा चिपळूण येथे आली असता समोरून मुंबई बाजूकडून येणारी शेवरलेट स्पार्क गाडीचा चालक अभय सुंडीकर (रा. कुडाळ) (गाडी नं. एम.एच. ०४३/एक्स ८२४८) ही हयगयीने व बेदरकारपणे चालवून रॉंग साईडला जावून समोरून येणार्या स्कॉर्पिओ गाडीला ठोकर देवून अपघात केला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून स्पार्क गाडीतील प्रवासी चंद्रकांत अनंत गंगावणे यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा मृत्यू झाला. व गाडीतील प्रवासी जखमी झाले.या प्रकरणी स्पार्क गाडीच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com