
दुकानात खरेदीसाठी येणारा ग्राहक केव्हाही फुटपाथवर खरेदी करत नाही, कोणाच्या तरी सांगण्यावरून विनाकारण कारवाई कराल तर याद राखा! : बंड्या साळवी यांचा नगरपरिषद प्रशासनाला इशारा
रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर ग्रामीण भागातील महिला, बेरोजगारांचे छोटे स्टॉल तसेच हातगाडीच्या माध्यमातून व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा स्थानिक गरीब फेरीवाल्यांवर सूडबद्धीने रत्नागिरी पालिकेने कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना स्टाईलने याचा जाब पालिका मुख्याधिरी यांना विचारू. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने कारवाई करताना शंभर वेळा विचार करावा असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडशेठ साळवी यांनी दिला आहे.
रत्नागिरी शहरात शहरानजीक असलेल्या गावातील महिला, बेरोजगार तरुण स्टॉल लावून किंवा फूटपाथवर बसून आपला व्यवसाय पिढ्यांपिढ्या करत आले आहेत. कोणाच्या तरी सांगण्यावरून रत्नागिरी पालिकेने या गरीब जनतेवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी पालिकेने वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. ज्यांनी तक्रारी केल्या आहेत, त्यांच्या व्यवसायावर फुटपाथवरील स्टॉलमुळे काहीही परिणाम होणार नाही. कारण दुकानात खरेदीसाठी येणारा ग्राहक केव्हाही फुटपाथवर खरेदी करत नाही. तर फुटपाथवर खरेदी करणारा ग्राहक शक्यतो तो वस्तू कधीही दुकानात जाऊन खरेदी करत नाही. तसेच व्यापारीही आमचेच आहेत. परंतु हातावर पोट असलेल्या गरिबांवर कारवाई करू नका, अशी आमची मागणी आहे.
ज्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होतो तेथे संबंधितांना पोलीस समज देतील. शेतमाल, कर्ज काढून खरेदी केलेले साहित्य जप्त करून गरिबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला शिवसेना स्टाईलने जाब विचारू असा इशारा बंड्या साळवी यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
www.konkantoday.com