ऐतिहासिक आणि अभेद्य अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावर 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जाणार,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती
मराठय़ांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि अभेद्य अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावर 4 डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जाणार आहे. या सोहळय़ाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.सिंधुदुर्गात होणाऱ्या या कार्यक्रमात 70 लढाऊ जहाजे सहभागी होणार आहेत.
हिंदुस्थानी आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते. व्यापारी, चाचे आणि ब्रिटिशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सागरी किल्ल्यांची गरज असल्याचे शिवरायांनी जाणले आणि त्यातूनच महाराजांनी अभेद्य असा सिंधुदुर्ग किल्ला बांधला. नौदल दिनानिमित्त हिंदुस्थानी नौदलाच्या सामर्थ्याचे मोठे शक्तिप्रदर्शन सिंधुदुर्गच्या समुद्रात होणार आहे. हिंदुस्थान-पाकिस्तानच्या 1971च्या युद्धादरम्यान हिंदुस्थानी नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार हल्ला करून पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडले होते. त्यानिमित्ताने दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस हिंदुस्थानी नौदलातर्फे विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
www.konkantoday.com