सचिनने घाई गडबडीत असताना सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत चिमुकल्याची इच्छा पुर्ण केली
क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने त्याचा 50 वा वाढदिवस नुकताच साजरा केला. वयाचं अर्धशतक साजरे करण्यासाठी त्याने देवभूमी कोकणात पोहोचला होता.
कोकणातील भोगवे येथील समुद्रकिनारी सचिनने आपला वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसाच्या निमित्ताने सचिन तेंडुलकर आणि त्याचे कुटुंब कोकणात होते. दरम्यान, वाढदिवसानंतर मुंबईकडे परतत असताना मोपा विमानतळावर एका चिमुकल्याची इच्छा पूर्ण केली व सर्वांची मने जिंकली.कोकणातून मुंबईकडे परण्यासाठी सचिन उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर दाखल झाला. विमान पकडण्यासाठी घाई गडबडीत असणाऱ्या सचिनची सावंतवाडीतील ओम अमोल टेंबकर या चिमुकल्याने भेट घेतली.
ओमने सचिनकडे सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या सिझनच्या बॉलवर ऑटोग्राफ करण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान, सचिनने घाई गडबडीत असताना सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत चिमुकल्याची इच्छा पुर्ण केली. सचिनच्या या कृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
www.konkantoday.com