
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं निधन.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं निधन झालं आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते भीषण जखमी झाले होते. त्यांच्यावर कोहीनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.समीर खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत होती. पण त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे शिवाजीनगर-माणकूर विधानसभेचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगरच्या उमेदवार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे अणुशक्तीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.नवाब मलिक यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो. या नुकसानीबद्दल आम्ही शोक व्यक्त करत आहोत’, असं नवाब मलिक ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तसेच या दुखद घटनेनंतर आपले पुढील दोन दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.