
ठाकरे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा -मंत्री उदय सामंत
राज्यातील राजकारणात काय होईल, याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. रोज वेगवेगळ्या राजकीय चर्चा झडत आहेत. आता तर ठाकरे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी महाबळेश्वर येथे भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगत असताना उदय सामंत यांनी नव्या चर्चेबाबत विधान केल्याने येत्या काळात राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार अशी चर्चा रंगली आहे.
नवी मुंबईतील खारघर येथील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरुन हटवले जाईल अशी चर्चा आहे. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अशा अनेक चर्चा असल्याचे सांगत ठाकरे सेनेतील उरलेले 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत अशा अनेक चर्चा सुरु आहेत, असे वक्तव्य केले आहे.
www.konkantoday com