
घरपट्टी आकारणीला मंत्र्यांकडून स्थगिती मात्र निधी मिळविण्यास अडचण येणार.
गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या नव्या घरपट्टी आकारणीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी तात्पुरती तोंडी स्थगिती दिली आहे. मात्र ती मंत्र्यांनी दिली असल्याने तोंडी असली तरी नगर परिषद प्रशासन सध्या याबाबत शांतच झाले आहे. असे असले तरी नव्याने आकारणी झालेली घरपट्टी भरली गेली नाही. तसेच वसुली वाढली नाही तर १५ व्या वित्त आयोगाचा संपूर्ण निधी मिळवता येणार नाही. यामुळे पथदीप व पाणी योजनेची विजबिले भरणे कठीण जाणार असल्याने याचा फटका नागरिकांना बसणार आहे.
दर चार वर्षानी मालमत्ता आकारणी योग्य पद्धतीने करण्याचा शासनाचा नियम आहे. यातूनच अचूक मापे घेतल्याने कर वाढून वसुलीही वाढवणे हा शासनाचा मुख्य हेतू आहे. त्यामुळे घरपट्टीत किती वाढ झाली, वसुली किती वाढली यावर शासनाचा त्या त्या वेळेच्या वित्त आयोगाचा निधी मिळत असतो पण गेली ८ वर्षे शासनाच्या या नियमाला येथे हरताळ फासली जात असल्याने त्याचा फटका वित्त आयोगाचा निधी मिळवण्याला बसत आहे.www.konkantoday.com