भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मूळ गाव असलेल्या दापोली तालुक्यातील मुरुड येथे स्मारकाचा प्रस्ताव धुळखात पडून
भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मूळ गाव असलेल्या दापोली तालुक्यातील मुरुड या गावात सरकारकडून २००५ साली स्मारक मंजूर केल्याची घोषणा करण्यात आली.भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे मुरूड हे मूळ गाव आहे. या ठिकाणी स्मारक उभारण्यासाठी गावकऱ्यांनी सहमती दर्शवली. स्मारकासाठी लागणारी चार गुंठे जागा स्मारक समितीकडे वर्गही करण्यात आली. स्मारकासाठी शासनाकडून १ कोटी रुपये मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले. परंतु, आजपर्यंत स्मारकाचा साधा पायाही रचण्याचे काम सुरू झालेले नाही. हा प्रस्ताव शासनदरबारी आजवर धूळखात पडला आहे.
भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या मूळ गावात सरकारकडून स्मारकाची घोषणा करण्यात आली. मात्र, स्मारकाचा विषय शासन दरबारी अजूनही उपेक्षितच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या हयातीत उभारण्यात आलेला अर्धाकृती पुतळा अस्तित्वात आहे. पण, ‘भारतरत्न’च्या मूळ गावातच स्मारक नसल्याची खंत ग्रामस्थांना आहे.
www.konkantoday.com