
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात एमएस्सी साठी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरीसरामधे विद्यमान शैक्षणिक वर्षाची (२०२१-२२) प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशपूर्व नोंदणी नंतर प्राप्त गुण व आरक्षण आधारित गुणवत्ता यादी नुसार प्रवेश दिले जातील. प्रवेशपूर्व नोंदणी करून आपला प्रवेश त्वरित निश्चित करण्याचे आव्हान उप परिसरातर्फे करण्यात येत आहे. प्रवेशपूर्व नोंदणीची लिंक मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उप परिसराच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
रत्नागिरी उप परिसरामध्ये एम. एससी. केमिस्ट्री, एन्विरोंमेंटल सायन्स, झूलॉजी तसेच मास्टर्स इन सोशल वर्क असे चार विभाग आहेत. यामध्ये केमिस्ट्री विभागात ऑरगॅनिक, इनोरगॅनिक, फिजिकल आणि ॲनालिटीकल तसेच झुलॉजी मधे ओशोनोग्राफी अँड फिशरी सायन्स असे स्पेशलायझेशन आहे.
उप परिसराचा मास्टर्स इन सोशल वर्क (एमएस डब्ल्यू ) हा विभाग कुडाळ मधे चालू आहे.सदरील विषयांचा अभ्यासक्रम हा चार सत्रात चालणार असून प्रथम वर्षात दोन व द्वितीय वर्षात दोन अशी सत्र असतील. विविध खाजगी तसेच सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा करायची असल्यास तसेच संशोधन करण्याची इच्छा असल्यास एम. एस्सी. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.रत्नागिरी उप परिसर ही संधी उपलब्ध करून देत असून उप परिसरामध्ये पदव्युत्तर शिक्षणाकरिता सुसज्ज क्लास रूम , प्रयोगशाळा,ग्रंथालय, इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे.
एम. एस्सी. करून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संस्था,सामाजिक संस्था,केमिकल इंडस्ट्री, पोल्यूशन कंट्रोल बोर्ड, रिसर्च इन्सटिट्यूट, अक्वा कल्चर इंडस्ट्री,फिश प्रोसेसिंग इंडस्ट्री ,शासकीय आस्थापना आदी वैविध्यपूर्ण क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होते. उप परिसरातील विभागांचा विविध उद्योगांसोबत समन्वय असून प्लेसमेंट सेल तर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करून विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याचा विशेष प्रयत्न उप परिसरामध्ये सातत्याने केला जातो.
उप परिसरात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त होणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येतो.विविध विभागाकडून शैक्षणिक वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात येते. तसेच करीयर मध्ये येणाऱ्या आव्हानांचा अनुभव घेण्याकरिता इंटर्नशीप साठी देखील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.
उप परिसराच्या सर्व विभागातील प्राध्यापक वर्ग क्वालिफाईड असून विद्यार्थ्यांना संशोधन, स्पर्धा, परीक्षा व भविष्यातील विविध क्षेत्रातील संधी बाबत मार्गदर्शन केले जाते.तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ संसाधन व्यक्तींना आमंत्रित करून उपयुक्त विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रे, परिषदा व कार्यशाळा आयोजित करण्यात येतात.
www.konkantoday.com