क्रिकेट प्रेमीचा लाडका व भारतीय क्रिकेट विश्वाचा देव सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गातील भोगवे किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटतोय
जगभरातील क्रिकेट प्रेमीचा लाडका व भारतीय क्रिकेट विश्वाचा देव सचिन तेंडुलकर याचे वेंगुर्ला तालुक्यातील परुळे-भोगवे गावांतील सागर किनारी (रविवार) आगमन झाले. त्याने भोगवे, किल्ले निवती सागर किना-यावर पर्यटनाचा आनंद घेतला. यावेळी काही चाहत्यांना फोटो सेशनची संधी दिल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचा 24 एप्रिल हा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला वेंगुर्ला भोगवे येथील सागर किनाऱ्यावर सचिन तेंडुलकर हजर झाला. तो आपला ५० वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्यातुन वेळ काढून त्याने सिंधुदुर्ग जिल्हयाच पर्यटन स्थळाना भेट दिली. परुळे भोगवे येथील हॉटेल मध्ये मुक्काम केला. किल्ले निवती भोंगवे सागर किनाऱ्यावर त्याने आपल्या सहकाऱ्यांसमवेत रविवारी संध्याकाळी फेर फटका मारला. यावेळी सर्वच क्रिकेट प्रेमींना त्याच्या दर्शनाने खुपच आनंद झाला. त्याने सर्वांसोबत फोटोसेशन केले. क्रिकेटच्या निमिताने आपलं जगभर फिरणं झाले परंतु भोगवे – निवती सारखा सुंदर स्वच्छ सागर किना-यावर फिरताना विशेष आनंद असल्याचे सचिनने सांगितले.
www.konkantoday.com