रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला, नुकत्याच संपलेल्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ४७ कोटी ३३ लाख रुपयांचा ढोबळ नफा, २० कोटी ९३ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्थिक वर्षात जिल्हा बँकेचे भाग भांडवल, ठेवी, कर्ज व्यवह लक्षणीय वाढ झाल्याबद्दल डॉ. चोरगे यांनी समाधान व्यक्त केले. उपाध्यक्ष श्री. बाबाजी जाधव, कार्यकारी संचालक श्री. अजय चव्हाण हे मान्यवर पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
सलग दोन वर्षे मान्यताप्राप्त युनियनसोबत वेतन कराराबाबत चर्चा सुरू होती. जिल्हा बँक, युनियन यांच्यातील चर्चा यशस्वी झाल्यानंतर वेतन करार करण्यात आला. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी यांच्या वाढीव पगारावर सुमारे ३ कोटी रुपये खर्च झाले. अन्यथा आर्थिक वर्षात ५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा जिल्हा बँकेला मिळाला असता, अशी माहिती डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिली. .
www.konkantoday.com