राजापूर महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने दाखवलेल्या जागृतेमुळे आईला भेटण्यासाठी एकटीच घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुले परत पालकांच्या ताब्यात

0
70


रत्नागिरी:चार वर्षांपूर्वी घर सोडून पुण्याला गेलेल्या आईची आठवण येत असल्याने पुण्याला जाऊन भेटण्याची इच्छा झाल्याने दोन अल्पवयीन मुलं घरातुन न सांगता बाहेर पडली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. घरच्यांनीही त्यांची शोधाशोध सुरु केली होती. याचवेळी सुदैवाने राजापूर एसटी स्टँडसमोर एका बाजूला बसलेली मुले राजापूर महिला पोलिसांच्या दामिनी पथकाला दिसली.
यावेळी महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने सतर्कता दाखवत चौकशी करून त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात सुरक्षितरित्या दिले आहे. विशेष म्हणजे घरातून न सांगता निघालेल्या मुलांची शोधा शोध घरच्यांनी सुरू केला होती. मात्र, हा प्रकार आजच सोमवारी सकाळी घडल्याने यासंदर्भात कोणतीही तक्रार पोलिसांकडे दाखल झालेली नव्हती. मात्र, दामिनी पथकाने दाखवलेली कौतुकास्पद सतर्कता यामुळे हा सगळा प्रकार समोर आला.
सोमवारी लांजा तालुक्यातील वाघण बौद्धवाडी येथील येथील राहणारे कुमारी साघवी महेंद्र जाधव (वय-१५), यथात महेंद्र जाधव (वय-१३ वर्ष) ही दोन अल्पवयीन मुले संध्याकाळी राजापूर एस.टी.डेपो समोर एका बाजुस बसलेली दिसली. यावेळी राजापूर पोलिसांच्या दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार हर्षदा चव्हाण आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुषमा स्वामी यांनी या मुलांकडे विचारणा केली. यावेळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.
यावेळी या मुलांनी सांगितले की, आपली आई चार वर्षांपूर्वी घर सोडून गेली. ती पुणे येथे असून आम्हाला तिची आठवण येत असल्याने तिच्याशी संपर्क करुन आम्ही पुणे येथे जात आहोत असे सांगितले. यावेळी त्यांचेकडे त्यांच्या वडिलांचे नाव विचारले असता मुलांनी महेंद्र गणपत जाधव (रा. वाघण गाव बौद्धवाडी ता. लांजा) असे असल्याचे सांगितले. वडील कोकण रेल्वेत कामाला असल्याचंही या मुलांनी सांगितलं. यानंतर दामिनी महिला पोलिसांच्या पथकाने तात्काळ वडिलांना फोनवर संपर्क करुन बोलावुन घेतलं. वडील आल्यावर दामिनी पथक मुलांना वडिलांसह घेवून पोलीस ठाण्यात आले.राजापूर पोलीस निरिक्षक जनार्दन परबकर यांनी मुलांना आणि वडिलांना समजावून सांगितले आणि मुलांचे मन परिवर्तन करुन दोन्हीही मुलांना सुरक्षितरित्या त्यांचे वडील महेंद्र गणपत जाधव, चुलते शिलेंद्र लांजा तालुक्यातील वाघण गावातील बौद्धवाडी येथे राहणाऱ्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना मुलांचे योग्य प्रकारे पालन पोषण करुन सांभाळ करण्याबाबात योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले. राजापूर पोलिसांच्या महिला दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे घरातून न सांगता निघालेली मुले पुन्हा घरी सुखरूप परतली आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here