रत्नागिरी शहरातील जयस्तंभ चौकाचे सुशोभीकरण सध्यातरी लांबणीवर

0
63


रत्नागिरी शहर पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षित करावे यासाठी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, जयस्तंभ चौक व सावरकर चौक याचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला होता त्याप्रमाणे त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता यासाठी जे जे आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने हे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते त्याप्रमाणे शहरातील मारुती मंदिर येथे अतिशय सुंदर अशी शिवसृष्टीची उभारणी करण्यात आली या शिवसृष्टीमुळे रत्नागिरीच्या सौंदर्यात पार पडली असून अनेक पर्यटक व स्थानिक नागरिक या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात त्यानंतर शहरातील शासकीय रुग्णालय जवळ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसराचेही अतिशय सुंदर पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आले या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही प्रसंगाचे चित्रे उभी करण्यात आली आहेत
त्यानंतर गाडीतळ भागात असलेल्या सावरकर पुतळा व चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले या ठिकाणी देखील सावरकरांच्या जीवनावरील काही प्रसंग कलाकृतीच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहेत त्यामुळे हे चौक रत्नागिरीच्या सौंदर्यात भर घालत आहेत मात्र पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केलेल्या जयस्तंभ चौकाचे नूतनीकरणाचे काम सध्या रेंगाळलेल्या अवस्थेत आहे या कामाला सुरुवात झाल्यानंतर जयस्तंभाला प्लास्टर ऑफ पॅरिस चे स्वरूप देण्यात आले मात्र त्यानंतर हे काम रेंगाळले गेले कामासाठी लावलेल्या लोखंडी पराती काढून घेण्यात आले आहेत तसेच जयस्तंभाला कापड गुंडाळून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काम पूर्णपणे थांबल्याचे दिसत आहे जयस्तंभ चौक हा शहरातील महत्त्वाचा चौक असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणाहून जात असतात त्यामुळे पालक मंत्री उदय सामंत यांनी याबाबत जातीने लक्ष घालून या चौकाच्या सुशोभीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत असे नागरिकांची मागणी आहे
www.konkantoday.com

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here