राज्य सरकारचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या आठ समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्र कुटी उभारण्याचा निर्णय

0
59

राज्य सरकारने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या आठ समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी समुद्र कुटी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, कुणकेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे, गुहागर, रायगडमधील दिवेआगार, वर्सोली आणि पालघर जिल्ह्यातील बोर्डी, केळवा या आठ समुद्रकिनाऱ्यावर समुद्रकुटी (बीच शँक्स) उभारण्यात येणार आहेत.
कोकणातील स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक व्यक्तींना यात 80 टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षाकरिता वाटप केले जाईल. किमान पंधरा फुटाची लांबी आणि रुंदी तसेच बारा फूट उंचीची ही कुटी असणार आहे. प्रत्येक कुटीमध्ये बसण्यासाठी पंधरा ते वीस फूट छत टाकता येईल, अशी व्यवस्था असणार आहे. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत या कुटी सुरू ठेवण्यास मान्यता दिली जाईल.

नियमानुसार या कुटी चालवण्याचे निर्बंध : तीन वर्षाकरिता दिल्या जाणाऱ्या कंत्राट पद्धतीत लाभार्थ्यांना पहिल्या वर्षासाठी 45 हजार, दुसऱ्या वर्षासाठी 50 हजार आणि तिसऱ्या म्हणजे शेवटच्या वर्षासाठी 55 हजार रुपयांचा आर्थिक शुल्क आकारला जाईल. याशिवाय 30 हजार रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. तीन वर्षानंतर सुरक्षा अनामत रक्कम परत करण्यात येईल. राज्य शासनाने घालून दिलेल्या अटी, शर्ती आणि नियमानुसार या कुटी चालवण्याचे निर्बंध असणार आहेत. तसेच प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार असून येथील पर्यटकांच्या गोंधळाचा कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी प्रत्येक कुटी मालकाला घ्यावी लागणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने दिली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here