रत्नागिरी शहरात उभारणार 25 कोटी रुपये खर्च करून वॉटर फाउंटन – पालकमंत्री उदय सामंत यांची घोषणा

0
84

रत्नागिरी शहराचा विकासात्मक व पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्नशील असून रत्नागिरी शहरासाठी २५ कोटी रुपये खर्चून पाण्याच्या स्क्रिनवर चित्र दर्शविणारा वॉटर फाऊंटन उभा केला जाणार असून जिल्ह्याने देशाला दिलेल्या सहा भारतरत्नांचे १५ ते  १८ फूटी चेहरे  रत्नागिरी शहरात उभे केले जाणार आहेत, अशी घोषणा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत केली.
रत्नागिरी शहरात पर्यटनाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत या दृष्टीने शहरात नागपूरच्या धर्तीवर वॉटर फाउंटन उभा केला जाणार आहे. नागपूर येथील या वॉटर फाऊंटनमध्ये पाण्याच्या स्क्रिनवर नागपूरचा इतिहास दाखविला जातो तसा फाऊंटन रत्नागिरीत उभा केला जाणार असून ४ तारखेला चेन्नई येथील तज्ञांचे पथक रत्नागिरीत येणार असून जागेची पाहणी करणार आहे. या फाऊंटनसाठी अंदाजे २५ कोटी रुपये खर्च येणार असुन महाराष्ट्र शासन यासाठी निधी देणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याने सहा भारतरत्न देशासाठी दिली या सहा भारतरत्नांचे १५ ते १८ फूटी चेहरे रत्नागिरी शहरात उभे केले जाणार असून त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय रत्नागिरी शहरात पर्यटनात भर पडावी यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मेडीटेशन सेंटरसाठी ५ कोटी, रत्नागिरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या पूर्णाकृती उभ्या पुतळ्यांसाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहे.
रत्नागिरीच्या पर्यटनात भर पडावी यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, त्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here