रत्नागिरी तालुक्यातील जि.प.पू.प्रा.शाळा जांभरुण नं.१ येथे परकार हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि परकार मेडिकल फाऊंडेशन्स स्कुल ऑफ नर्सिंग रत्नागिरी मार्फत सर्व वयोगटातील महिलांसाठी महिला आरोग्य प्रबोधन मेळावा संपन्न उत्साहात संपन्न झाला. यावेळी नर्सिंग स्कुल मध्ये शिकणार्या मुलींनी कृतीयुक्त स्वच्छता गीत सादरीकरण केले आणि त्याचे शाळेतील मुलांकडूनही सादरीकरण करवून घेतले.
याप्रसंगी मासिक पाळी वेळी घ्यावयाची काळजी, ती केव्हा सुरु होते? केव्हा बंद होते?स्वयं स्तन परिक्षा अशा विविध स्रियांच्या जिव्हाळ्याच्या आणि त्यांना संकोच वाटणा-या बाबींवर नर्सिंग स्कुलच्या विद्यार्थ्यांनींनी पथनाट्याद्वारे उपस्थित महिलांचे प्रबोधन केले. शाळेने हा घडवून आणलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम यामुळेच सर्वांच्या कौतुकाचा आणि समाधानाचा विषय ठरला.
याप्रसंगी उपस्थित महिलांचे मधुमेह चाचणी व रक्तदाब तपासणीही करण्यात आली.या कार्यक्रमात नर्सिंग स्कुलच्या किरण सुर्वे, श्रद्धा गार्डी, ऐश्वर्या सावरे,सायली साखरकर,श्रद्धा शिंदे, साक्षी मांडवकर,साक्षी सावंत, प्राजक्ता आग्रे,मानसी नागले,मानसी जोशी या विद्यार्थ्यांनींनी सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पूजा चवेकर आणि ममता मठकर यांनी केले तर नियोजन शाळेचे मुख्याध्यापिका रजनी मोहिते यांनी केले होते. हा कार्यक्रम होण्यासाठी परकार हॉस्पिटलचे ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. मतीन परकार सर यांचाही मोलाचा वाटा असून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेश पवार, प्रकाश कामेरकर, राजू कोकणी या शिक्षकांनी मेहनत घेतली.
www.konkantoday.com