परदेशात २७ वर्षे अडकून पडलेल्या इकबाल पावसकर यांच्यासाठी लांजा येथील मुस्लीम वेल्फेअर संस्था देवदूत ठरली
ओमान देशात विविध संकटामुळे
तब्बल २७ वर्षे अडकून पडलेल्या रत्नागिरी केळ्ये मजगाव येथे इकबाल पावसकर यांच्यासाठी लांजा येथील मुस्लीम वेल्फेअर संस्था देवदूत ठरली आहे समितीने त्यांना आपल्या मायदेशीच नव्हे तर रत्नागिरी नजिकच्या केळ्ये मजगाव येथील घरीही सुखरूप आणले.लांजातील मुस्लिम वेल्फेअर सोसायटी आणि तिचे कार्याध्यक्ष अकिल नाईक व सहकारी. या सोसायटीच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे अकिल नाईक हे नोकरी निमित्ताने परदेशात काम करतात. काही महिन्यापूर्वी ते ओमान देशात गेले होते.
यावेळी त्यांना इकबाल हसन पावसकर हे बेपत्ता असल्याचा फोटो व्हॉटसअॅपवर फिरताना दिसला. त्यावेळी काही व्यक्तींनी या फोटोबाबत चौकशी केली. अखेर ही व्यक्ती तेथील एका हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती मिळाली. अकिल नाईक तिथे गेले तेव्हा इक्बाल पावसकर तिथे असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यांच्याकडे ओळखपत्राचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पावसकर याचे हॉस्पिटलचे जवळपास ४-५ लाखांचे बिल झाले होते. हे बिल मुस्लीम वेल्फेअर सोसायटीच्या सदस्यांनी मोफत करुन घेतले.
तिथून त्यांना भारतात आणायचे कसे,असा प्रश्न निर्माण झाला. कोणतीच कागदपत्रे नसल्याने भारतात नेण्यासाठी पासपोर्ट काढणे कठीण झाले होते. मात्र, तेथील कामगार विभागाचे अहमद यांनी सुमारे ३ लाखापर्यंत दंड मुस्लिम वेलफेयर सोसायटी यांच्या सांगण्यावर माफ केला. इंडियन एम्बसी सलालाचे प्रमुख एजन्टसनानाथ थार यांच्या सहकार्यामुळे आऊट पासपोर्टसाठी मदत केली. पण काही पुरावा नसल्याने पासपोर्ट अडकला. अखेर मस्कत येथे कार्यरत असणारी AIM (डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ) ओमानचे प्रकाश पंडित यांच्या प्रयत्नामुळे पावसकर यांचा पासपोर्ट तयार झाला आणि मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून ते भारतात येण्यास निघाले.
इकबाल यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने विमान प्रवास कसाबसा पार करत ते भारतात परतले आणि मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अकील नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने ते तब्बल २७ वर्षानंतर आपल्या कुटुंबात पोहोचले मुस्लिम वेलफेअर सोसायटीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे
Www.konkantoday.com