चिपळुण पूरग्रस्तांच्या मदतीला पंचायत समिती रत्नागिरी चा पुढाकार

रत्नागिरी : काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे *चिपळूण शहर, चिपळूण परिसर आणि खेड परिसरामध्ये मोठ्या स्वरूपात आलेल्या विध्वंसक महापुरामुळे पुरग्रस्तांचे कोट्यावधी रूपयांचे भरून न येणारे नुकसान झाले.
  झालेल्या नुकसानीची दखल घेत सर्वसामान्य लोकांना सहकार्य म्हणून रत्नागिरी पंचायत समितीच्या वतीने नुकतीच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्यात आली. यासाठी *रत्नागिरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या *शिक्षण विभागाच्या वतीने एकूण *तीन लाख रुपये आणि पंचायत समिती रत्नागिरीच्याअंतर्गत येणारे इतर विभागाच्या वतीने जवळपास दोन लाख रुपयांची मदत जीवनावश्यक वस्तुंच्या स्वरूपात प्रत्यक्षात पुरग्रस्त भागात जाऊन करण्यात आली.  ही मदत उभारण्यासाठी पंचायत समिती रत्नागिरीच्या सभापती संजना माने, पंचायत समिती रत्नागिरीचे गटविकास अधिकारी जाधव साहेब, यांच्यासह उपसभापती उत्तम सावंत, पंचायत समितीचे सदस्य गजानन पाटील, माजी सभापती मेघना पाष्टे, माजी उपसभापती सुनील नावले, यांच्यासह पंचायत समितीचे सभापती सदस्या आकांक्षा दळवी, गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते, यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य, शिक्षक समन्वय समिती, विविध विभागाचे विभागप्रमुखयांनी स्वतःहून पुढाकार घेत चिपळूण पुरग्रस्तांसाठी निधी उभारला. शिक्षण शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील शिक्षकांनाही सहकार्य करत निधी जमा केला. यासह विविध विभागाच्या विभागप्रमुखांनी गटविकास अधिकारी टी. बी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निधी संकलित केला. जमा झालेला निधीतुन चिपळूण शहर व चिपळूण परिसरामध्ये* आलेल्या महापुरातील *पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध प्रकारचे साहित्य जमवून या लोकांची मदत करण्यासाठी पुढाकार घेत जीवनावश्यक वस्तु  प्रत्यक्ष स्वरूपामध्ये चिपळूण या ठिकाणी जाऊन पुरग्रस्तांना पुरविल्या.
 यावेळी पंचायत समिती रत्नागिरीच्या सभापती संजना माने, पंचायत समिती रत्नागिरीचे गटविकास अधिकारी टी. बी. जाधव साहेब, यांच्यासह उपसभापती उत्तम सावंत, पंचायत समितीचे सदस्य गजानन पाटील, गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते, माजी सभापती मेघना पाष्टे, माजी उपसभापती सुनील नावले, पंचायत समितीचे सभापती सदस्या आकांक्षा दळवी, शिवसेनेचे वाटद विभाग संघटक उदय माने, गडनरळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य नामदेव चौघुले, यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य, समन्वय समितीसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारीभर पावसाची तमा न करता चिपळूण व परिसरातील बांधवांच्या मदतीला उपस्थित होते.
*पंचायत समिती रत्नागिरीचे पदाधिकारी, अधिकारी, पंचायत समितीचे सर्व विभागासह शिक्षणविभाग यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल चिपळुण परिसरातील पुरग्रस्थांनी समाधान व्यक्त केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button