होम स्टे, हॉटेल व्यावसायिकांसाठी औद्योगिक दराने वीज पुरवठा देण्याकरिता आणि सर्व समस्यांकरिता आराखडा तयार करूया,-माजी आमदार प्रमोद जठार
रत्नागिरी : आपण आपल्या त्रुटी जाणून घेतले पाहिजेत. आपण कोकणी लोक कोकणच्या प्रेमात एवढे वेडे होतो की जगाला विसरतो. गोव्याचे मोठे पर्यटन केंद्र असताना रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वेगळ्या पद्धतीने पर्यटन आराखडा बनवावा लागेल. होम स्टे, हॉटेल व्यावसायिकांसाठी औद्योगिक दराने वीज पुरवठा देण्याकरिता आणि सर्व समस्यांकरिता आराखडा तयार करूया, असे प्रतिपादन सिंधुरत्न योजनेचे सदस्य, माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले.
मारुती मंदिर येथील विवा एक्झिक्युटीव्हमध्ये रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था आयोजित पाचव्या शाश्वत पर्यटन परिषदेचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. ते म्हणाले की, विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियमचा शोध लागला. ही माहिती कळल्यावर मी १८ ऑगस्टला तिथे हेलिमय दिवस साजरा करायला सुरवात केली. गेली १४ वर्षे हा कार्यक्रम साजरा होतोय. आपल्या जिल्ह्यात पर्यटन का वाढत नाही, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपण जन्मतःच वकिल असल्यासारखे वागतो. अति चिकीत्सक आहोत. आपले प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत.
पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी श्री. जठार यांचा सत्कार केला. याप्रसंगी संजय नाईक, प्रमोद केळकर, संजय यादवराव, आरती कुलकर्णी, चव्हाण, कौस्तुभ सावंत, उदय लोध, संतोष नलावडे, युयुत्सू आर्ते, संजय सूर्यवंशी, महेश पेडणेकर, धीरज वाटेकर, उपस्थित होते.
महामार्ग २०२४ पर्यंत पूर्ण होणार
श्री. जठार पुढे म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गासाठी मी फार पूर्वीपासून भांडलो. कारण पर्यटन विकासासाठी महामार्ग अत्यावश्यक आहे. सीमेवर जवान शहीद झाले नाहीत एवढे लोक वीस वर्षांत मृत्यूमुखी पडल्याची आकडेवारी मी विधानसभेत दिली होती. नंतर मंत्री नितीन गडकरी यांनीही या रस्त्यात प्राधान्याने लक्ष घातले. सिंधुदुर्गातील रस्ता पूर्ण झाला. रत्नागिरी जिल्ह्यात रखडलेला महामार्ग २०२४ पर्यंत पूर्ण होईल.
हजार हाऊस बोटीचे उद्दिष्ट- संजय यादवराव
बंद पडलेल्या ट्रॉलर्सवर ३० लाख रुपयांत हाऊस बोट बनवली आहे. संपूर्ण कोकणात अशा एक हजार बोटी बनवल्या तर पर्यटक कोकणात मोठ्या संख्येने येईल. याकरिता ४० टक्के सबसिडी सिंधुरत्न योजनेतून मिळावी. तसेच होम स्टे करिता सबसिडी द्या. तसेच विज बिल औद्योगिक दराने द्या, अशी मागणी संजय यादवराव यांनी या वेळी केली.