
कबड्डीला रत्नागिरीतील महिला कबड्डी संघाने उच्च स्तरावर नेवून ठेवले:- उदय सामंत
रत्नागिरी – रत्नागिरी दौऱ्यावर असताना रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी सभेला रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे पार पडली. या सभेला असोसिएशनचे कार्यकारणी सदस्य उपस्थितीत होते. यावेळी बालेवाडी पुणे येथे झालेल्या ७१ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला संघाने उपविजेतेपद पटकावल्याबद्दल त्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी – रायगडचे पालकमंत्री आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष या नात्याने मंत्री उदय सामंत म्हणाले, सातत्याने जिंकण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून जे काही सहकार्य करावं लागेल ते करु आणि रत्नागिरीच्या पुरुष आणि महिला संघाचा महाराष्ट्राच्या कबड्डीच्या तक्तापर्यंत नेऊन पोचू असे आश्वासन उपस्थित कार्यकारणी सभासद आणि खेळाडूंना दिलं.चॅम्पियन शिप फक्त एक वर्ष नाही काय स्वरूपी आपल्याकडे राहील असे काम करू.आज कबड्डीला रत्नागिरीतील महिला कबड्डी संघाने उच्च स्तरावर नेवून ठेवले त्याचा मला रत्नागिरीचा अध्यक्ष या नात्याने गर्व आणि अभिमान आहे. मी अध्यक्ष झाल्यावर तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्याचे कबड्डी असोसिएशनचे कार्यालय देतो म्हणून जाहीर केले ते कार्यालय लवकरच महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या कार्यालयाला लाजवेल असं कार्यालय येथील कबड्डीपटूंसाठी मी उभे करणार आहे. या कार्यालयातून कबड्डी संघ आणि त्यामध्ये खेळणाऱ्या न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यापुढे जाऊन अध्यक्ष म्हणाले मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी वेगळं काम करून दाखवतो आणि कदाचित माझा अध्यक्ष झाल्यावर पायगुण चांगला असेल यासाठी महाराष्ट्रातील काही कंपन्यांनी आपल्या कबड्डी असोसिएशनला तब्बल 50 लाख रुपये निधी देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कबड्डी संघांना तसेच कबड्डीपटूंना यापुढे घाबरण्याची गरज नसून ज्या ज्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून माझी गरज लागेल त्या ठिकाणी उदय सामंत तुमची ढाल बनवून उभा राहील. या कार्यकरणी मध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी विश्वाला चांगले दिवस येतील. असे निर्णय आज अध्यक्ष उदय सामान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष मंगेश तांबे, उपाध्यक्ष मंगेश मोरे, उमेश सकपाळ, दामू जगूष्टे, अभिजित सप्रे,नितीन बांद्रे, तसेच जिल्हा कार्यकरणी सदस्य उपस्थित होते.