डोक्यात स्टूल मारून महिलेला केले जखमी

0
116

रत्नागिरी : किरकोळ कारणातून नात्यातीलच महिलेच्या डोक्यात स्टूल मारुन तिला जखमी केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना रविवार 29 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वा. झारणी रोड येथे घडली आहे. सिराज सुलेमान होडेकर (रा. बिरादर कॉम्प्लेक्स झारणी रोड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे .त्याच्याविरोधात नाझीया अरशद होडेकर (40, रा. बिरादर कॉम्प्लेक्स झारणी रोड, रत्नागिरी) यांनी सोमवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविवारी दुपारी त्या नात्यातील लग्नाला जात होत्या.त्यावेळी त्यांनी आपल्या सासर्‍यांना किचनमधून संशयिताच्या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी असलेल्या दरवाजाची कडी न लावण्याबाबत सांगून गेल्या होत्या. त्या परतल्या असता त्यांना संशयिताने कडी लावल्याचे समजताच त्यांनी संशयिताला तू कडी लावल्यास माझ्या सासु-सासर्‍यांना जाता येणार नाही असे सांगितले. याचा राग आल्याने सिराजने त्यांना शिविगाळ करत लाकडी स्टूल त्यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here