देवरूखच्या साहिल घडशीची राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

0
49

संगमेश्वर : ३२ वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा नुकत्याच श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे झाल्या. यात चमकदार कामगिरी केलेल्या साहिल घडशीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली.
सदर राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व संगमेश्वर तालुका अकॅडमीच्या अंतर्गत सुरू असलेल्या नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लबच्या ४ तायक्वांदोपटूंनी केले होते. यामध्ये ४६ ते ४८ या वजनी गटामध्ये साहिल शशांक घडशीने अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले, राज रोशन रसाळ याने ७५ ते ७८ या वजनी गटातमध्ये कांस्यपदक पटकावले. धनंजय जाधव याने ४६ किलो आतील वजनी गटामध्ये व राहुल सागर चव्हाण याने ५१ ते ५५ या वजनी गटामध्ये अतिशय चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले.
या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या साहिल घडशी याची निवड ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम- आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या अजिंक्यपद राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here