खेड : कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी खेडमध्ये 95 टक्के मतदान झाले. 518 पैकी 492 शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी दिली. सकाळी 8 वाजता मतदान सुरु झाले. सकाळी 10 नंतर मतदान करण्यासाठी शिक्षकांनी रांगा लावल्या होत्या. भाजप व शिंदे गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे , महाविकास आघाडीचे शेकापचे उमेदवार आमदार बाळाराम पाटील, तसेच शिक्षक भारतीचे ध. ना. पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बुथ लावले होते. ध. ना. पाटील हे खेडचे असल्याने त्यांचे समर्थक अधिक प्रमाणात दिसत होते. आमदार योगेश कदम यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.