रिफायनरी विरोधकांच्या तडीपारी संदर्भातील सुनावणी दि. 7 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली

0
23

राजापूर : रिफायनरी विरोधकांसंदर्भात राजापूर प्रांत कार्यालयात सुरु असलेली तडीपारी संदर्भातील सुनावणी दि. 7 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
बारसू सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीला पुन्हा एकदा विरोध सुरु करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोध करणार्‍या सहाजणांना पोलिस यंत्रणेकडून तडीपारी का करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावण्यात आली होती. या संदर्भात प्रांताधिकारी सुनावणी सुरु आहे. मंगळवार 24 जानेवारी रोजी सुनावर्णीं होणार होती. परंतु ती आता 7 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, सत्यजीत चव्हाण, सतिश बाणे, दीपक जोशी, नितीन जठार, नरेंद्र जोशी हे सहाहीजण मंगळवारी उपस्थित होते.
या बाबत बोलताना अमोल बोळे म्हणाले की, आमचे म्हणने आम्ही प्रांतांसमोर ठेवले आहे. या भागात आतापर्यंत झालेले सर्वेक्षण हे बेकायदेशीर होते. त्याला कोणतेही परवानगी नव्हती. परवानगीशिवाय आम्ही सर्वेक्षण करु देणार नाही. यापुढेही आमचा लढा सनदशीर मार्गाने सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here